मी मराठी शाळेतच शिकलो आणि तिथे 'टंड्रा' असाच उच्चार शिकवला होता. असो. मला वाटते हे भूगोल शिकविणाऱ्या शिक्षकाचे ज्ञान/अज्ञान असावे.

v/w  बद्दल असे वाटते की, 'v' आणि 'wh'चा उच्चार 'व्ह' आणि 'w'चा उच्चार 'व' असा शिकवला गेला आहे. मुळात 'v'चा उच्चार 'वी' असा शिकवावा का? अमेरिकन्स 'v' ह्या मुळाक्षराचा उच्चार कसा करतात?इंग्रजी अनेक उच्चार पूर्वी वेगळे आणि हल्ली वेगळे आहेत असे वाटते. भारततीय इंग्रजी, राणीच्या काळातील आहे. इंग्लंडमध्येही भारतीय इंग्रजीला 'क्वीन्स इंग्लिश' असे हिणविले जाते असे कुठेसे वाचले आहे. 'with'चा उच्चार 'विथ' असाही होतो आणि 'वुईथ' असाही होतो. कुठला बरोबर? 'वुईथ' बरोबर असेल तर 'without'चा उच्चार 'विदाऊट' का? 'वुईदाऊट' का नाही? एक जुना प्रश्न 'cut' कट्, 'but' बट् तर 'put' पट का नाही? असो.