श्री. विलासराव,
निरुपम निरूपण. फारच छान. हरिपाठाच्या सर्वच्या सर्व म्हणजे २८ अभंगांवर आपले रसाळ निरूपण वाचून त्यावर चिंतन करणे आणि त्यानुसार वर्तन करणे, हे आमच्यासाठी मोठे भाग्याचे लक्षण आहे.
ज्ञानेश्वरी, हरिपाठ, गाथा हे नुसते वाचावयाचे ग्रंथ नाहीत. अनेक लोक वर्षानुवर्षे वाचतात पण शेवटी त्यांच्या हाताला काहीच लागत नाही. कारण ते नुसतेच वाचत असतात. त्यांच्या आचरणात त्या ग्रंथांचे प्रतिबिंब दिसत नाही.
अध्यात्म हा विषय अनुभवायचा आहे. म्हणून
एक तरी ओवी अनुभवावी ।।
मनोगतावरील सन्मार्गातील साधकांच्या अनेक शंकांचे निवारण आपल्या लेखनातून होईल आणि साधकांची साधना फलद्रूप होईल अशी आमची भावना आहे.
२८व्या अभंगात तर स्वतः ज्ञानेश्वरांनी तशी ग्वाही दिलेली आहे.
नित्य पाठ करी इंद्रायणीतींरी । होय अधिकारी सर्वथा तो ॥
संतसज्जनांनी घेतली प्रचीती । आळशी मंदमती केवीं तरे ॥
श्रीगुरु-निवृत्तीनाथ वचन प्रेमळ । तोषला तात्काळ- ज्ञानदेव ॥
हरि मुखे म्हणा हरी मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥
अजून काय बरें हवें?
लोकहितवादी