ब्रिटिश उच्चार बरेच भारतीय उच्चारासारखे आहेत( कि, भारतीयांचे ब्रिटिशांसारखे). त्यामुळे त्यांचे इंग्रजी समजायला सोपे जाते. पण सगळे ब्रिटिश सारखेच उच्चार करतात असेही नाही. काही जणांचे बोलणे सहजासहजी समजते तर काहींचे समजावयास वेळ लागतो(सॉरी म्हणून पुन्हा एकदा कान देऊन ऐकावे लागते).
शिवाय, जे भारतीय आहेत पण इथे राहून शिकले आहेत त्यांचे उच्चार न भारतीय न ब्रिटिश असे होऊन जातात. कधी कधी ते i can म्हणतात कि, i can't हे सहजासहजी लक्षात येत नाही.
श्रावणी