आपल्याकडे शब्दांचे केवळ अर्थ शिकवले जातात. त्या अर्थामागचा संदर्भ लक्षात घेतला जात नाही.
ध्रुव महोदयांशी सहमत.
आणखी एक उदाहरण द्यायला आवडेल.
वेंडिंग आणि मॅरेज या शब्दातला फरक आपल्याला भारतात शिकवला जात नाही. वरकरणी हे दोन्ही सारखे वाटतात आणि भारतात आपण ते एकमेकांऐवजी वापरले जाताना पाहतो.
पण या दोन्ही मध्ये फरक आहे असे वाटते. कसे ते पाहा...
मॅरेज चा अर्थ लग्न/विवाह असा होत असला तरी ते लग्न/विवाह 'मोडणे' यातले लग्न आहे, लग्न/विवाह 'झाले' मधले नाही. मॅरेज हा लग्न/विवाह 'संस्था' याअर्थी वापरला जाणारा शब्द आहे. तर वेंडिंग चा अर्थ लग्न/विवाह 'सोहळा' असा आहे.
त्यामुळे मॅरेज हे नाते आहे तर वेंडिंग ही घटना आहे. म्हणून आपण नेहमी 'वेंडिंग इन्व्हिटेशन' द्यायला हवे, 'मॅरेज इन्व्हिटेशन' नाही.
'वेन इज युअर मॅरेज?' असा प्रश्न भारतीय लोक करताना आढळतात, ते चूक आहे असे वाटते 'वेन इज युअर वेंडिंग?' किंवा 'वेन आर यु गेटींग मॅरीड?' हे योग्य प्रश्न आहेत असे वाटते.
त्यामुळेच 'वेंडिंग चॅपेल्स' (ढोबळ भाषांतर - लग्न/विवाह कार्यालय)(घटना) असतात आणि 'मॅरेज सर्टिफिकेट' (लग्न/विवाहाचा दाखला)(नातेसंबंध) असते.
हा फरक परदेशात आल्यावर लक्षात आला.
इंग्लिश भाषेचे (लेखी व बोली) उत्तम ज्ञान आणि पकड असूनसुद्धा माझे बाबा हे दोन शब्द वापरताना हमखास गल्लत करतात.
नवीन भाषा शिक(व)ताना नुसते शब्द न शिक(व)ता त्यांच्या छटा आणि वापर हे दोन्ही काळजीपूर्वक शिक(व)ले पाहिजे असे वाटते.