"हार्दिक" हेच रूप बरोबर आहे, "हार्दीक" हे नव्हे.
मनोगतचा शुद्धलेखनचिकीत्सक "हार्दिक" हा शब्द चूक व त्याला "हार्दीक" हा बरोबर पर्याय दर्शवतो. तसेच "नेहमी चुकणारे शब्द" मध्येसुद्धा हा शब्द "हार्दिक" चूक व "हार्दीक" बरोबर असा नोंदवला गेला आहे. परंतु या शब्दातील प्रत्यय "इक" हा तद्धित प्रत्यय आहे, "ईक" नव्हे. "इक" या तद्धित प्रत्ययाच्या नियमांच्या पुढील विवेचनावरून व पुढे दिलेल्या उदाहरणांवरून, "हार्दिक" हेच रूप बरोबर आहे, "हार्दीक" हे नव्हे, हे सहज लक्षात येईल. (स्रोत: http://sanskrit-sanscrito.com.ar/english/sanskrit/sanskrit9intro.html#Taddhitapreliminarystudy)
"इक" हा तद्धित प्रत्यय लागताना पुढील नियम लागू होतात:
उदाहरणार्थ:
मूळ शब्द: "शरीर" पासून (नियम १ लागून) "शारीर" पासून (नियम ३ लागून) "शारीर्" + (नियम ८ लागून) "इक" = "शारीरिक".
मूळ शब्द: "बुद्धी" पासून (नियम १ लागून) "बौद्धी" पासून (नियम ३ लागून) "बौद्ध्" + (नियम ८ लागून) "इक" = "बौद्धिक".
याचप्रमाणे, मूळ शब्द: "हृद्" पासून (नियम १ लागून) "हार्द्" पासून (नियम २ लागून) "हार्द्" + "इक" = "हार्दिक".
(शुद्धलेखनचिकीत्सकामध्ये व "नेहमी चुकणारे शब्द" या पुस्तकात योग्य ती दुरुस्ती करण्यासाठी प्रशासकांना व्यक्तिगत निरोप पाठविलेला आहे.)
- टग्या.
ता.क.: तेव्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दीक नव्हे! ;-)