माझे शालेय शिक्षण मराठी माध्यमातून आणि अगदी लहान गावात झालेले आहे पण तरी आम्हाला टंड्रा प्रदेश असेच शिकवलेले मला आठवत आहे. असो.
आता थोडे मूळ प्रवाह सोडूनः
मी बरीच वर्षे J ह्या इंग्रजी अक्षराचा उच्चार जाईजुईतल्या ज सारखा करत होते. पण पदव्युत्तर शिक्षण घेत असताना कळलं की इंग्रजीत जाईजुईतला ज नाहीच. आहे तो जास्वंदीतला आहे. पण आजही J चा जाईजुईतल्या ज सारखा उच्चार करणारे मराठी लोक भेटतात. किंबहुना "अमक्यातमक्याने केलेला J चा उच्चार ऐकून मी ओळखलं की तो मराठी आहे." असेही परप्रांतीयाने म्हटलेले ऐकले आहे. टुंड्रा प्रमाणेच ह्याबाबतही 'असे का होते' असा प्रश्न पडतो.