आमची मूळ समजूत आणि सराव टग्या ह्यांनी स्पष्टीकृत केलेल्याप्रमाणेच होता, मात्र जालावरील काही संदर्भांमुळे आमची दिशाभूल झाली आणि तसे दोष शुद्धिचिकित्सकात निर्माण झाले. असो. आता योग्य ते बदल केलेले आहेत.
मनोगतींना शुद्धलेखनाबद्दल कळकळ आहे हे ह्या निमित्ताने अधोरेखित झाले हे ह्या दिवाळीत चांगले झाले. अशाच प्रकारे पुढेही असे स्वारस्य आणि मार्गदर्शन लाभेल ह्याची आम्हांस खात्री वाटते, शुद्धलेखनाची सुविधा अधिकाधिक बळकट करण्याच्या मार्गावर आम्ही एकटेच पडणार अशी भीती आता गेल्याने आमचा हुरूप वाढला आहे.
हार्दिक धन्यवाद.