काही मुद्दे

उच्चार महत्त्वाचे पण त्यापेक्षाही शुद्धलेखन महत्त्वाचे आहे. उच्चार राणीसारखे पण व्याकरण, शुद्धलेखन दिव्य याला काही अर्थ नाही. आणि त्याचा बाऊ करण्यात येऊ नये. टुंड्रा असो वा टंड्रा, ती नक्की काय चीज आहे, हे माहीत असणे महत्त्वाचे. हो की नाही?

आमचे एक प्राध्यापक यालेक्ट्रिकल, यिंजिनियरिंग असे उच्चार करायचे. ते तमिळ होते. पण, त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व अतिशय वाखाणण्याजोगे होते. म्हणींचा, वाक्प्रचारांचा उपयोग. भाषा ओघवती. सहज. असो.

अगदी इंग्लडातही दक्षिण इंग्लडातल्या लोकांचे उच्चार (त्यालाच ते रिसिव्ड प्रनन्सिएशन म्हणतात बहुतेक) प्रमाण मानण्याचे दिवस आता संपले आहेत, असे वाटते.
(ऑक्सफ़र्ड डिक्शनरीप्रमाणे प्रनन्सिएशन हा उच्चारही योग्य नाही. तो प्रनन्सिऐशन असा आहे- प्रनन् सिऐशन. )

काँट्र्वर्सी आणि कंट्रॉवसी असे दोन उच्चार प्रचलित आहेत. मग आता कुठला स्वीकारावा? असे अनेक शब्द आहेत. नाम (नाउन) असले की उच्चार वेगळा. तोच शब्द क्रियापद (वर्ब) झाल की वेगळा उच्चार. उदाहरणार्थः
project हा शब्द नाम म्हणून आला की त्याचा उच्चार प्रोजेक्ट(ऑक्सफ़र्डप्रमाणे प्रौ जेक्ट) होतो.
project हा शब्द क्रियापद म्हणून आला की त्याचा उच्चार प्र जेक्ट असा करता.

असो.त्यापेक्षा भारतीय उच्चार बरे. गोंधळ कमी.

भारताचे माहीत नाही, पण आंतरराष्ट्रीय उच्चार आता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या दृष्टीने पाठ्यपुस्तक मंडळाने पावले उचलली आहेत. नव्या इंग्रजी भाषेच्या पाठ्यपुस्तकांत आता वेरी गुड आंतरराष्ट्रीय उच्चार आहेत असे कळते. त्यामुळे शिक्षकांनाही नव्याने शिकावे लागते आहे. असो.

तुम्ही भारतात कशाला येता?बॉस्टन मध्ये राहणाऱ्याला टेक्सन उच्चार वेगळे आणि गंमतीदार वाटतात. पुन्हा तिथेही ग्रामीण आणि शहरी असा वाद आहेच.

थोडक्यात, "In our infinite ignorance, we are all equal," हेच खरे.


चित्तरंजन