१. या पानावर वर डाव्या कोपऱ्यात "माझे सदस्यत्व' असे दिसेल त्यावर शिफ्ट दाबून टिचकी मारा, म्हणजे ते नवीन खिडकीत उघडेल आणि इथल्या सूचना वाचत वाचत बदल करता येतील.
२. त्या वेगळ्या खिडकीत उघडलेल्या पानाच्या वरच्या बाजूला "संपादन" नावाचा टॅब दिसेल. त्यावर टिचकी मारा.
३. त्यात टॅब च्या खाली "खात्याची मांडणी" आणि "वैयक्तिक माहिती" असे दोन 'दुवे' दिसतील.
४. "वैयक्तिक माहिती" वर टिचकी मारा.
५. तिथे तुम्हाला हवी ती माहिती भरा.
६. माहिती भरताना शुद्धलेखन तपासायला विसरू नका.