एक गंमत म्हणून सांगतो, रेल्वेच्या बाजूला बऱ्याच वेळा 'कर्षण स्टेशन' असे वाचले. इंग्रजीत पाहिले तर होते 'traction station' आता, 'कर्षण' हा शब्द कसा आला? तर 'attraction' चे मराठीत 'आकर्षण' होते. त्यामुळे 'traction' चे 'कर्षण' झाले असावे...
ध्रुवमहोदय,
कर्षण हा संस्कृत शब्द आहे असे वाटते. कृष् - कर्ष् - १ प०प० ह्या धातूवरून निर्माण झालेले ते नाम असावे असे वाटते. संस्कृतातूनच इंग्लिश इत्यादी अर्वाचीन भाषा निर्माण झालेल्या असल्यामुळे अशी साम्यस्थळे पदोपदी आढळतात हे खरे आहे.
आपला
(मूलकर्षक) प्रवासी