चित्तराव,

माहीत असावे. माहित नाही.

योग्य.

आणि माझी 'चिकित्सा'/'चिकित्सक' शब्द लिहितानाची चूक नजरेस आणल्याबद्दल आभारी आहे. (आपला नेमका प्रतिसाद सापडत नाही. बहुधा काढून टाकला गेला असावा.) का कोण जाणे, ते शब्द 'चिकीत्सा'/'चिकीत्सक' असे डोक्यात बसले होते. (कदाचित 'परीक्षा'/'परीक्षक' या शब्दांशी असलेल्या साधर्म्यामुळे असेल.) आणि हे चूक असू शकेल, आणि आपण म्हटल्याप्रमाणे या शब्दांमधील 'कि' हे अक्षर ऱ्ह्स्व असू शकेल (जसे, 'चिकित्सा'/'चिकित्सक'), अशी अंधुकशी शंका होती, परंतु खात्री नव्हती, आणि दाखल्यासाठी संदर्भदेखील नव्हता. आपण माझी चूक निदर्शनास आणून दिल्यावर थोडे संशोधन केले, आणि दाखला मिळालादेखील. (मनोगतवरच इतरत्र 'ऱेड' नामक मनोगतीने नुकताच संस्कृत शब्दकोशाचा दुवा दिला आहे. तसेच संस्कृत शब्दकोशाचे या दुव्यासारखे इतर दुवेही उपलब्ध आहेत.) तेव्हा यापूर्वीच्या लेखनात या शब्दाबाबत झालेली ही चूक दुरुस्त करणे अवघड / अशक्य आहे, परंतु यापुढे ही चूक होणार नाही.

पुन्हा एकदा आभार.

- टग्या