खल उपलब्ध नसेल तर आणखी एका प्रकारे करता येतो ठेचा. थोडासा ओबडधोबड होतो पण चवीला मस्तच.
तव्यावर ८-१० शेंगदाणे भाजून एका ताटलीत काढून घ्यावेत. मग तेल टाकून हिरव्या मिरच्या पांढऱ्या रंगापर्यंत भाजाव्यात.त्यातच लसणाच्या २ पाकळ्या टाकून मग गॅस बंद करा. नंतर भाजलेले शेंगदाणे, जाडे मीठ टाकून तांब्याने चांगले रगडावे. तवा सांडशीने पकडून ठेवावा. जाड मीठाने चांगले रगडले जाते. नसेल तर नेहमीचेही चालेल. रगडल्यानंतर पुन्हा थोडा वेळ मंद गॅसवर गरम करावे. मस्त कुरकुरीत ठेचा तयार. याला रगडतात म्हणून मिरचीचा रगडा असेही म्हणतात. 
हा शीतकपाटाच्या बाहेर कित्येक दिवस टिकतो. बाजरीच्या भाकरीबरोबर मस्त लागतो.

टीपः तांब्या नसेल तर गोल बुडाच्या वाटीने रगडले तरी जमते.

ही कळण्याची भाकरी कसली असते ?

श्रावणी