कळण्याचे पीठ कसे बनवावे-

१ कि. ज्वारी, पाव किलो उडीद, दोन (चहाचे) चमचे मेथ्या, १ टे.स्पू. खडे मीठ एकत्र दळणे.

कळण्याची भाकरी बनवताना पोपडे सुटायला हवेत. वरील पापूद्रा/पोपडा काढून त्यावर ठेचा/चटणी व कच्चे तेल टाकून परत पोपडा वरून तसाच ठेवणे - भाकरी सुंदर लागते.  (कारे भो नारखेडे, बरोबर आहे ना ?)  

कळण्याच्या भाकरी बरोबर चटणी-

४/५ हिरव्या मिरच्या थोड्या भाजून घेणे, बरोबर ७/८ लसूण पाकळ्या घेणे, १ वाटी शेंगदाणे भाजून व थोडी कोथिंबीर बारीक चिरून ह्या सर्व वस्तू मिक्सर मधून बारीक फिरवणे. त्यात थोडे पाणी घालून दाटसर पातळ बनवणे. वरून जिऱ्याची फोडणी दिली की झाली चटणी तयार.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आईकडून आलेली अपग्रेडेड इन्फॉर्मेशन !

कुठलीच चटणी/ठेचा बाहेर टिकत नाही. फ्रीजमध्ये कोथिंबीर न घालता आठवडाभर टिकतो ( उरला तर !) बाहेर काढून कोथिंबीर घालून वापरता येतो.