कालच ई-टिव्ही मराठीच्या संवाद मध्ये एका शर्मा नावाच्या जोतीष्याची मुलाखत होती त्यानी वर्तवलेली शरद पवारांच्या बद्दल दोन भविष्येः

१. शरद पवार बी‌ सी सी आय  चे अध्यक्ष म्हणुन निवडुन येतील.

२. एप्रिल २००६साली ते परत महाराष्ट्राच्या राजकारणात येउन मुख्यमंत्री होतील

मागे वसुधा वाघ ह्यांनी टि.व्हीवरच आपले व्याही मनोहर जोशी २००४ साली पंतप्रधान होतील असं भविष्य वर्तवलं होतं! त्या निवडणुकीत मनोहरपंतांचं पंतप्रधानपद जाउ द्यात.... डिपॉझिट जप्त झालं!