डाळगंडोरी खाल्ली आहे (उफ!) - पण समीर, तू लिहिल्यानंतर लक्षात आले की ही सर्वांनाच बनवता येत नाही.... कारण मी जेंव्हा जेंव्हा डाळगंडोरी खाल्लेली आहे, तेंव्हा ती एकाच माणसाकडून बनवून घेतलेली होती. फौजदारी डाळ मात्र कधी ऐकलीही नाही (कदाचित माझे नशीब बलवत्तर असावे !)

बिबड्यांपेक्षा मला त्याचा घाटाच लसणाची चटणी घालून खायला आवडतो... तसेच गव्हाच्या कुरडयांचा घाटाही ही चटणी घालून मस्त लागतो. 
हल्ली बिबड्यांही (मसाला पापड सारख्या सजवून) हॉटेल मध्ये देतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे धुळे ते वरणगांव पर्यंत सर्वच हॉटेल्स मध्ये खानदेशी प्रकार प्रामुख्याने मिळायला लागले आहेत. त्यामुळे रोडवे ने घरी जाई पर्यंत- हायवे वरच्या सर्वच हॉटेल्स मध्ये फक्त पंजाबी एके पंजाबी खाऊन कंटाळा येत नाही; तसेच काही आवडीचे पदार्थ ज्यांत एखाद्या समाजाचेच वैशिष्ट्य होते, तेही पदार्थ सहजपणे उपलब्ध व्हायला लागलेत ( व महाजालावर पण मराठीत यायला लागलेत)  

भरीताची कृती २/४ दिवसांत देईनच ! शेवभाजी आपल्या कडच्या एका मालकंस नावाच्या मनोगतीने पूर्वी दिली आहे. पंगतची भाजी, डाळ बट्ट्या, मसाला वांगी - ह्या सारख्या बऱ्याच विविध कृती देण्या लायक आहेत त्या (खानदेशी लोक वाचून प्रतिसाद देत नाहीत ना ) कृती येथे देण्याची इच्छा आहे
खानदेश म्हणजे केळी व वांगी ! महाराष्ट्रात किंवा भारतात इतरत्र रोडवेने फिरताना नेहमी लोकल डिश घ्यावी म्हणजे तेथले खाणे नेमके कसे असते हे कळते.

ह्या सर्व चर्चेवरून एक भ्रमणध्वनी वर आलेला लघु संदेश आठवला-
मेरे खानदेश की धरती; वांगोंकी भरती ; 
कितना भी लिखती, कितना भी पढती ।
युके भी जाती और यूएस से आती ;
पर एकच बात बोलती....................
"काऽऽव माऽऽऽय ; कुढी गेलती ?"