माधव,श्रावणी, परीक्षित,

माहितीबद्दल आभार.

आता खानदेशी खाद्यपदार्थांवर चर्चा चालू आहे तर कोणी मांडे या पदार्थाविषयी काही सांगेल काय?  मी फ़क्त मांड्याचे नाव ऐकले आहे,  कधी पाहिलासुध्धा नाही तर खाण्याचे भाग्य कोठून लाभणार? गेल्या वर्षी सकाळ साप्ताहिकात महाराष्ट्रातील पदार्थांविषयीच्या माहितीत मांड्याची माहिती होती.  त्यात मांडे समप्रमाणात तुप, रवा, साखर घेऊन करतात असा उल्लेख होता, पण माझ्या नाशिकच्या मित्राने हातावर घेऊन मोठ्या केलेल्या पुरण पोळीलाच मांडे म्हणतात असे सांगितले.  तरी जाणकार माहिती पुरवतील का - म्हणजे दिसतो कसा? करतात कसा? लागतो कसा?

साधना