जागतिक स्तरावर "सुदृढ मांजर" स्पर्धेचे धमाकेदार आयोजन करण्यात आले होते. निरनिराळ्या देशांचे प्रतिनिधित्व मांजरे करत होती.
भारताच्या बोक्याने पाकिस्तानी चोरट्या बोक्याला चारीमुंड्या चित करून उप-उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तिथे नकट्या चीनी बोक्याला हरवले. उपांत्य फेरीत त्याची गाठ, स्वतःच्या ताटाखालील मांजराला (इंग्लंडच्या मांजराला) हरवून आलेल्या अमेरिकन बोक्याशी होती. बिहारमध्ये विशेष प्रशिक्षण घेतलेल्या भारतीय बोक्याने, गबदुल अमेरिकन बोक्याचाही पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम फेरीत भारतीय बोक्याच्या विरुद्ध सोमालियाचा बोका होता!!! सर्वजण आश्चर्य व्यक्त करत होते, सोमालियाचा बोका अंतिम फेरीपर्यंत आलाच कसा? शेवटी अंतिम फेरी सुरू झाली. भारतीय बोक्याने शर्थीचे प्रयत्न केले पण सोमालियाच्या बोक्याने अखेरीस विजय संपादन केला.
स्पर्धेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारले "सोमालियात खाण्यापिण्याची ददात असताना, लोक भुकेने मरत असताना सोमालियाच्या बोक्याने सुदृढ मांजर स्पर्धा जिंकावी हे नवलच!"
त्यावर तो उत्तरला,
"बोका? मी सोमालियाचा वाघ आहे !!!"