साधना आणि रोहिणी,
मी देखील मांडे हा प्रकार आजपर्यंत दोनच वेळा खाल्ला आहे ः( मांडे पुरणपोळीसारखाच (आणि पुरणापासुनच केलेला) असतो, पण अतिशय पातळ लाटलेला असतो. असे म्हणतात की प्रकाशाच्या दिशेने घरल्यास आपण पलीकडचे पाहू शकतो!!! (Semi-transparent)
नेहमीच्या पोळीच्या साधारण दुप्पट ते तिप्पट आकाराचा असतो ... बराचसा रुमाली-रोटी सारखा, पण गोड. बनवण्यास फारच अवघड, आणि आतातर बनवणारे लोकही कमी झाल्यामुळे मिळण्यासही कठीण ! त्यामुळेच कदाचीत "मनात मांडे खाणे" हा वाक्यप्रचार रुढ झाला असावा !
पुण्यात पुर्वी (साधारण ४-५ वर्षांपूर्वीतरी) कोथरुडजवळ कोणी एक महिला घरी मांडे बनवून विकायची ... त्यांमुळेच मला तेंव्हा खायला मिळाले होते ः)
- (आतामात्र मनातच मांडे खाणारा) परीक्षित !