शुद्धिचिकित्सक वापरण्याची सवय नेहमी चांगलीच. खूपच घाईत असलो तरच छोटा प्रतिसाद टाकताना मी चिकित्सक वापरत नाही परंतू बहुदा ह्याचा वापर नियमित करतो.
शुद्धिचिकित्सक वापरताना जाणवले की कित्येक प्रचलित शब्द बरोबर असून चिकित्सक त्याला दुरुस्त्या सुचवतो.....
हा व असे अनेक प्रतिसाद शुद्धलेखनाच्या प्रत्येक लेखावर आलेले असतील तरीही त्यात म्हणावी तशी सुधारणा होत नसल्याचे दुःख आहे. मनोगत व प्रशासकांतर्फे ह्यावर स्वतःकडून काय प्रयत्न होत आहेत जे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
त्याच चुका परत परत होत नसल्या तरी नवीन चुका होतच आहेत व त्यासाठी परत हेच दळण दळणे भाग पडावे हे खेदजनकच आहे.
आजच्याच माझ्या कथेतले व्यक्तीश्या हे बरोबर दाखवत असून व्यक्तिशः हे चुकीचे दाखवत आहे. हॉस्पिटल ला असे म्हणण्याचा प्रघात असताना हॉस्पिटलाला अशी दुरुस्ती सुचवीत आहे. (हे म्हणजे थंब रूल सारखे इस्पितळाला सारखे वाटते) काही वेळा इतक्या शब्दांची सुचवणी कुठून येते तेच कळत नाही तर काही वेळा एखाद्या शब्दाला पर्यायी शब्द दाखवतच नाही.
कुठल्याही सिस्टमची विश्वासार्ह्यता (आता हा शब्द बरोबर म्हणावा का चुकीचा ?)महत्त्वाची असते. विनायकरावां सारखेच माझेही ह्या बाबत निगेटिव्ह मत होईल की काय अशी भिती मला वाटू लागलेली आहे.