शुद्धिचिकित्सक वापरताना जाणवले की कित्येक प्रचलित शब्द बरोबर असून चिकित्सक त्याला दुरुस्त्या सुचवतो.....

असे झाले की तो शब्द आणि त्याच्या सुचवलेल्या दुरुस्त्या आम्हाला कळवा. अन्यथा आम्हाला ते कळायची शक्यता नाही.

म्हणावी तशी सुधारणा होत नसल्याचे दुःख आहे

सुधारणा होतच आहे. सुधारणेचा वेग हवा तितका नाही, ही शुद्धिचिकित्सकाकडून सुधारणेच्या वेगाची ठेवलेली अपेक्षा हुरूप वाढवणारीच आहे.

त्याच चुका परत परत होत नसल्या तरी नवीन चुका होतच आहेत व त्यासाठी परत हेच दळण दळणे भाग पडावे हे खेदजनकच आहे.

त्याच चुका परत होत नाहीत हेच सुधारणेचे लक्षण आहे. तुम्ही फक्त चुकांची यादी आम्हाला कळवा.  आणि पुष्कळ सदस्य आम्हाला व्य नि मधून कळवतच आहेत.

(हे म्हणजे थंब रूल सारखे इस्पितळाला सारखे वाटते)

अगदी बरोबर. मराठी शब्द मूळ स्वरूपात साठवलेले आहेत आणि त्यांची हजारो रूपे नियम लावून आयत्या वेळी 'गाठवून' त्याच्याशी लिखित शब्दांची तुलना केली जाते. जसजसे नवे अनुभव येत जातील तसतसे ह्या नियमांत सुधारणा आणि अपवाद केले जातात. हे नियम कसे करायचे, का करायचे ह्याचे विशिष्टीकरण कुठे आयते मिळालेले नाही, तेही सुधारणा करता करता घडत आहे. त्याच त्याच चुका परत होत नाहीत असे आपण म्हणता, तसे असेल तर चाललेले काम योग्य दिशेने होत आहे असे म्हणावे लागेल.

काही वेळा इतक्या शब्दांची सुचवणी कुठून येते तेच कळत नाही तर काही वेळा एखाद्या शब्दाला पर्यायी शब्द दाखवतच नाही.

दरवेळी प्रत्येक सुचवण पटणारी असेलच असे नाही. सुचवण आहे ह्याचा अर्थ लिहिलेला शब्द शुद्धिचिकित्सकाला कळला नाही असा अर्थ होतो. येथे जर तुमचा शब्द बरोबर असेल, तर तो आम्हाला कळवा, आम्ही त्यावर विचार करू. पर्याय न सापडलेले शब्द आपोआप संकलित केले जातात आणि उपलब्ध वेळेनुसार त्यावर यथावकाश कार्यवाही होते. हे आम्ही अनेकदा सांगितलेले आहे. आणि न कंटाळता सांगत राहू.

कुठल्याही सिस्टमची विश्वासार्ह्यता (आता हा शब्द बरोबर म्हणावा का चुकीचा ?)महत्त्वाची असते.

सध्या बाजारात विकत घेतल्या जाणाऱ्या, लोकप्रिय प्रणाली त्यांच्या सुरवातीच्या काळात किती विश्वासार्ह होत्या (आणि आज आहेत) ते आपण सर्वजण पाहातच आहो. अर्थात हे समर्थन म्हणून लिहिलेले नाही. विकत असो किंवा विनामूल्य, पूर्ण कार्यान्वित व्यवस्थेची विश्वासार्हता महत्त्वाची असतेच. येथे शुद्धिचिकित्सकाची घडण अजून चालू आहे. अजून उत्पादन दर्जा आलेला आहे असा आमचा दावा नाही.

विनायकरावां सारखेच माझेही ह्या बाबत निगेटिव्ह मत होईल की काय अशी भिती मला वाटू लागलेली आहे.

आमचे स्वतःचे जोवर मत धनचिह्नांकित आहे, तोवर शुद्धिचिकित्सकात वाढ, बदल आणि सुधारणा चालूच राहतील.