पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतात.  आता पुणेही cosmopolitan बनत चालले आहे. तरीही तिथे मराठी नीट वापरत असावेत असा अंदाज आहे (कमीत कमी सरकारी कामकाजात तरी). पण मी पाहिलेल्या एका नामफलकावर (दिशादर्शक) बालगंधर्व रंग मंदिर  हे बालगंर्धव रंग मंदिर  असे लिहिलेले पाहिले. इतर शहरात असते तर हे लक्षात राहिले नसते. परंतु पुणे म्हणून लक्षात राहिले.

हे कुठे लिहावे लक्षात आले नाही (कळले नाही). नवीन लेख लिहावा एवढा मोठा मुद्दा मला वाटत नाही. पण हे आपल्या मराठी विश्वाचा एक भाग म्हणून इथे लिहिले. काही चुकल्यास प्रतिसाद काढून टाकीन.