येथे लिहिताना केवळ शुद्धिचिकित्सकातल्या आपल्याला दिसलेल्या / वाटलेल्या चुका आणि आपल्या सुचवणी ह्याबद्दलच लिहावे. हे करताना केवळ शुद्धिचिकित्सकातील शब्द, मनोगताच्या रचनेत प्रशासनाने वापरलेले शब्द, आपल्या स्वतःच्या लेखनातील शब्द किंवा अगदी मनोगताच्या बाहेरील साहित्यातले शब्द ह्यांचीच उदाहरणे घेऊन चर्चा करावी.

स्वतः व्यतिरिक्त इतर सदस्यांच्या लेखनातील शुद्धलेखनावर टिप्पणी करू नये.

शुद्धिचिकित्सकाची घडण चालू आहे आणि त्यात सतत बदल होत असतात, आमच्या शुद्धलेखनसामग्रीच्या स्रोतांवरही मर्यादा आहेत, ह्या गोष्टी हे सर्व करताना विसरू नये.

कृपया सहकार्य करावे.