शुद्धिचिकित्सकाच्या वापराने शुद्धलेखनाच्या चुका आणि लिहितानाच्या बारीक सारीक चुका (उदा. काना/मात्रा विसरणे इ.) सहज दुरुस्त होतात. शुद्धिचिकित्सक नुसता वापरून देखील तो अधिकाधिक सक्षम बनवण्यासाठी आपोआप हातभार लागतो हेदेखील प्रशासकांनी सांगितले आहेच. त्यामुळे शुद्धिचिकित्सकाचा नेहमी वापर सर्वांच्याच फायद्याचा आहे असे वाटते.

मनोगत या संकेतस्थळाने बऱ्याच गोष्टी 'पहिल्यांदा' केल्या आहेत. अजूनही यासारखे पूर्णतः मराठी पोर्टल पाहण्यात नाही. त्यातही, मराठी भाषेसाठी शुद्धिचिकित्सक बनवण्यामागे असणाऱ्या तांत्रिक अडचणी पाहता, प्रशासकांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.

आपला,
('शुचि'त) शशांक

शुद्धिचिकित्सकाने "पूर्णतः" ओळखले नाही. हा शब्द योग्य आहे का?