कवितेच्या सुरुवातीस ही 'गदिमा' ह्यांची कविता आहेत हे उद्घृत न केल्याने (आणि मला माहीत नसल्यामुळे) मी ही कविता वेदश्रीजींची म्हणूनच वाचली. वाचताना, वेदश्रीजींचे काव्य-लेखन भलतेच सुधारले असा, आनंद झाला. परंतु, तळाशी पोहोचल्यावर भ्रमनिरास झाला.
काय प्रयोजन असावे? 'मला आवडलेली कविता' असे शीर्षक असायला हवे होते. नीलहंस कसे बालकवींच्या कविता मनोगतावर देतात. वाचकांची दिशाभूल होत नाही. अर्थात, वेदश्रीजींचा 'तसा' उद्देश नाही हे मला ठाऊक आहे पण त्यांनी निष्काळजीपणा टाळावा म्हणून हा प्रतिसाद.