मी बंगलोर (बंगळुरु - हे बरोबर आहे ना?) मधे राहतो. मागे एकदा एका लग्नाला जायचा योग आला होता. त्यावेळी जो सुंदर पदार्थ खाल्ला तो मांडे होता तर! तिथे मांडे, फेणी सारखा एक पदार्थ, त्यावर दूध आणि पिठीसाखर असे वाढले होते. 

मांडे आणि फेण्या एकत्र फारच मस्त लागतात बुवा !! (आता त्यांच्या घरी बारशाचा कार्यक्रम कधी आहे याची वात बघतोय. कदाचित हा पदार्थ पुन्हा मिळेल  ;)  )

-(हावरट) शशांक