मंडळी,

प्रतिसादांबरोबर येथे चर्चा करून छान छान खाद्यपदार्थांची आठवण करून दिल्या बद्दल धन्यवाद -
हिवाळा आला की भाज्या/फळे तर स्वस्त होतातच पण भूक वाढते, अपचन होत नाही (म्हणून आमच्या डॉक्टर्स लोकांच्या कॉन्फ़रन्सेस ह्या सीझनमध्ये असाव्यात!) व चांगले चूंगले खायचे डोहाळे लागतात.
रोज मनोगतावर एका खाद्यपदार्थाची कृती आपण सर्व लिहूया का ? येथे ती आधी देण्यात आलेली असली तरी चालेल - आपण कोणत्या पद्धतीने ती करता ते कळणे महत्त्वाचे !
यामुळे बरीच उद्दिष्टे एकत्र साध्य होतील-

  1. आपले लेखन तर होईलच पण तो पदार्थ लिहिताना तो कसा बनवायचा त्याची उजळणी होईल.
  2. आपली खास पद्धत इतरांना कळून त्यांना त्याचा फायदा होईल.
  3. हिवाळ्यात बऱ्याच मनोगतींकडून आलेल्या पाककृती वाचून बनवून व खाऊन आपला हा हिवाळा 'गुलाबी' जाईल (व माझ्या सारख्यांना वजन वाढवणारा)

चला तर आपापले वजन सांभाळीत मनोगतावर नवीन पाककृती देऊया !