ही एक जटील समस्या , न सुटणारे कोडे आहे. घटनेप्रमाणे भारतात कुठेही उपजिविकेसाठी स्थलांतर करता येते. बेकारी , गरीबी हे प्रश्न त्याच्या मुळाशी असावेत. जास्त कष्ट न करता पैसा कसा मिळेल याकडे युवकांचे नव्या शतकात लक्ष आहे. अर्थात , चैन , मौज ही प्रवृत्ती असलेल्यांबद्दल लिहित आहे. गुन्हेगारी प्रवृती ही एक मानसिक विकृतीच समजली जाते.दैनिक उघडले कि रोज अशाच बातम्या ठळकपणे वाचाव्या लागतात. परप्रांतीयानाच केवळ दोष देण्यात अर्थ नाही. त्याना हाताशी धरून इथलेही लोक असे उद्योग करत असतिल. बरबरटलेले गट राजकारण हेही एक प्रमुख कारण [अनेक कारणांपैकी] असु शकेल.