मी सुद्धा पुण्यात मिसळ खायला गेलो टिळक रोडवर्च्या मिसळसाठी फेमस हाटेलात.... पण अरेरे त्या पदार्थाला मिसळ म्हणवत नव्हते.
पुण्यात मिसळ खायलाच जायचे तर नारायण पेठेत मुंजाबाच्या बोळात अण्णा बेडेकरांच्या हॉटेलात* जा. (बेडेकर टी स्टॉल). खुद्द अण्णा बेडेकर हयात असताना तेथे मिळणाऱ्या मिसळीची सर ते वारल्यानंतर त्यांच्या मुलांनी धंदा चालवायला घेतल्यानंतर तेथे मिळणाऱ्या मिसळीला कदाचित तेवढीशी नाही, पण अजूनही तेथे खूपच चांगली, झणझणीत मिसळ मिळते.
- टग्या
* येथे हॉटेल हा शब्द खास पुणेरी अर्थाने (उपाहारगृह अशा अर्थाने) वापरला आहे.
बाय् द वे, हे टिळक रोडवरचे तथाकथित मिसळीसाठी फेमस हॉटेल म्हणजे नेमके कोणते हो?