पेठकर,

अतिशय हलक्या फुलक्या आणि ओघवत्या अशा नर्म विनोदी शैलीत तुम्ही लिहिलेले हे तारुण्यातल्या स्मृतींचे मनोगत मनोगतच्या प्रकृतीशी अतिशय मिळतेजुळते आणि वातावरणाला पोषक असेच आहे. अनुभवांचे भांडार प्रत्येकाकडेच असते आणि प्रामाणिक अनुभवकथन कित्येकदा तर्ककर्कश युक्तिवादांपेक्षा आणि नीरस पांडित्यापेक्षा अधिक परिणामकारक ठरते, हे आपण पाहतोच.

तुम्ही असेच अधिकाधिक लिहीत राहावे असे वाटते. अश्याने 'ज्योतसे ज्योत जलाते चलो' अश्या वृत्तीने, इतर अनेक विविध क्षेत्रातले मनोगती आपापले अनुभव लिहिण्यास प्रवृत्त होतील ह्यात शंका नाही.

सर्व लेखन ह्या एकाच लेखाच्या खाली प्रतिसाद म्हणून लिहीत न राहता त्याचे वेगवेगळे लेख करा. ते एकत्र दिसतील आणि उपलब्ध होतील ह्याची व्यवस्था नंतर करता येईल.