कविवर्य मिलिंद,

आपण एक सशक्त काव्य निर्माण केले आहे. आपण प्रस्तुत केलेल्या या काव्यातून "कर्तव्यांच्या पहाडाखालून बाहेर पडून मोकळा श्वास घेण्यासाठी असूसलेला एक निरागस बापूडा" डोळ्यादेखत पाहीला; कदाचित (काही वर्षांपूर्वीचा) माझा "बा"!

आणी कदाचित म्हणूनच माझ्याकडून "वाह वा!" ची दाद तुम्हाला देऊ शकलो नाही.

असेच दमदार काव्य करत राहीलात तर कोण्या हळव्याच्या डोळ्यांतून अश्रृंची दाद मात्र तुम्हाला मिळत राहील यात शंका नाही... अशी दाद खूप कमी साहत्याच्या नशीबी येते म्हणतात.

अभिनंदन!

आपला,

(हळवा) भास्कर