कांदा बटाटा भाजीला पण काचऱ्या म्हणतात का ?? हे माहितच नव्हतं. आम्ही नुसत्या बटाट्याच्या चकत्यांच्या भाजीलाच काचऱ्या म्हणतो. आणि कधीकधी बटाट्याच्या चकत्यांबरोबर ओला नारळ + हिरवी मिरची घालतो. कशी का असेना बटाटा भाजी एकदम आवडती आणि करायला सोपी आणि लवकर होणारी.