अगं,

हैद्राबाद मधे जास्त करून भातच खूप खातात. म्हणजे वेगवेगळे प्रकार भाताचे.  आमचे एक नातेवाईक आहेत हैद्राबादमध्ये. ते सांगत असतात. पण बिर्याणी जास्तच प्रसिद्ध आहे (मुघलाईचा खूप प्रभाव आहे ना!).  बाकी तिथली लोणची, चटण्या सुद्धा चवदार असतात. मसालेदार आणि झणझणीत असा मांसाहार करतात. कुलचा नावाचा एक पराठा असतो ज्यात कांदा/बटाटा/पनीर याचे सारण भरलेले असते किंवा नुसता मैदा, रवा यांचा पण असतो.

एकंदर खवय्ये लोक असतात आणि पानाचेही शौकिन असतात.