मनोगतावर खूप प्रतिभावान लेखक, कवी आहेत. त्यांना कौतुक करताना नामवंतांशी तुलना किंवा साधर्म्य जाणवून दिले तरी वाईट वाटेलसे वाटत नाही. शिवाय वाचकांच्याही काही आठवणी जागृत होतात. नारायण धारपांचा उल्लेख मीच केला, पण त्यामागील माझी आठवण त्याला कारणीभूत आहे. क्षणभर जुन्या काळात गेलो, त्यामागे कोणाला दुखावण्याचा, अथवा उपहासाचा उद्देश नक्की नाही. असो, "स्पष्ट वक्ता" चे विचार पूर्णतः नाकारले जाऊ शकत नाही. मी तरी यापुढे काळजी घेईन.
समीर