वेदश्री बालगीते इथे दिल्याबद्दल आभारी आहे. ह्या गाण्याबद्दल तुझे निरीक्षण अचूक आहे.

असेच एक बालगीत (वय वर्षे दीड- अडीच मधील मुलांना हे गीत हावभावांसह म्हणायला गंमत वाटेल असे वाटते.)इथे देते आहे, रचना कोणाची आहे त्याची कल्पना नाही. मनोगतींना माहिती असेल तर जरूर सांगा.

लहान माझी बाहुली
मोठी तिची सावली
नकटे नाक उडविते
घारे डोळे फिरविते

भात केला कच्चा झाला
वरण केल करपून गेल
पोळी गेली करायला
हात तिचा भाजला

बाहुली लागली रडायला
खाऊ दिला खायला...

बाहुली लागली?
हसायला...!!!