सुभाष,
रागावू नका पण "हॉटेल" मध्ये खाण्याच्या अनुभवाचे वर्णन थेट "पु.लं.ची अपूर्वाई" असल्यामुळे खटकले.
अजिबात राग नाही. 'पु.ल.' या महामानवाचा आमच्या जीवनावर (सरळसोट आयुष्याला 'जीवन' वगैरे म्हणणे.... इति पु.लं.) भलताच प्रभाव आहे. पु.लं. साहित्य वाचून वाचून वाचून वाचून रोमरोमात, श्वासोच्छ्वासात 'पु.लं.' भरलेले आहेत. त्यांना स्वत:पासून वेगळे करणे या आयुष्यात तरी शक्य नाही. 'पु.लं.'शी बरोबरी होऊच शकत नसली तरी त्यांचा प्रभाव लिखाणात येतच राहाणार.
एक मात्र स्पष्ट करू इच्छितो, लिहिलेला अनुभव १०० टक्के प्रभाकर पेठकर याच्या जीवनातला आहे. तुम्ही दाखवून देई पर्यंत पु.लं. च्या साहित्याशी असलेले त्याचे साम्य ध्यानातही आले नाही. पु.लं.चे लिखाण हे सर्वसामांन्यांच्याच आयुष्यातल्या सामान्य घटनांवर आधारित असल्यामुळेच हे साम्य अपघाताने माझ्या लेखात आले आहे. यावर तुम्ही विश्वास ठेवाल ही अपेक्षा.
मला कॉपीच करायची असती तर ती पु.लं. सारख्या महान आणि इतका मोठा वाचक वर्ग असलेल्या लेखकाची केली नसती. त्या पेक्षा अविनाश घोलतकर यांच्या लेखनातून केली असती. ( कारण त्यांना तुम्ही वाचलेले नाही याची मला खात्री आहे. कशी काय? अहो, अविनाश घोलतकर नांवाचा कुणी लेखक अस्तित्वातच नाही.) असो.
तुमच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
'कट्ट्याचा....' पुढील भाग लवकरच.
इतर मनोगतींनीही 'आपाप्ले' (इति पु.लं.) अनुभव पाठवून ही 'पु'लांची टोपली सजवावी.
धन्यवाद.