अंजूताई,
मोगलाई दिल्लीत, हैदराबादेत निजामशाही. सतराव्या/अठराव्या शतकात चार दशके मोगलाईचे शासन होते खरे पण १७२४ पासून भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत निजामाचे शासन होते. शिवप्रभूंच्या आधिपत्याखालील मराठी लोकांसाठी दोन्ही (कु)शासने सारखीच म्हणा :)
शिवाय हैदराबाद शहरातील (खाद्य)संस्कृती आणि आंध्रप्रदेशातील (खाद्य)संस्कृती खूप वेगळ्या आहेत. हैदराबाद शहरातील जनतेवर मुस्लिम खाद्यसंस्कृतीचा प्रभाव आहे तर आंध्रप्रदेशीय जनतेची खाद्यसंस्कृती इतर दाक्षिणात्य राज्यातील बांधवांप्रमाणे आहे. आंध्रप्रदेशीय आम जनता तिखट खूप खाते असे ऐकले आहे. खाद्यपदार्थांच्या विविधतेविषयी अधिक माहिती सहकाऱ्यांना विचारून सांगेन.
आपला,
(सत्यशोधक) शशांक
संदर्भ: हैदराबादचा इतिहास