स्पष्ट वक्ता यांनी मांडलेला चर्चेचा विषय विचार करण्यास भाग पाडतो.

माझ्या मते जर दुसऱ्याशी तुलना करून कोणी काव्य रचनेला प्रतिसाद दिला असेल तर ते कौतुक आहे की copy  करण्याची जाणिव हे प्रतिसादाच्या शैलीवरून स्पष्ट होणे थोडेसे कठीण आहे.

आपण ज्या पद्धतीने बोलताना हावभावांनी ही माहिती प्रसारित करतो त्या पद्धतीने लेखन प्रतिसादातून माहिती प्रसारित करणे थोडे कठीणच आहे.  त्यामुळे जोपर्यंत आपल्याला प्रतिसाद योग्य माहिती देत नाही तोपर्यंत खुलासा मागवणे हाच एक योग्य उपाय होऊ शकतो.