अंजू,

मला येथे हैद्राबादमधील तेलगु मैत्रिणी मिळाल्या. त्या बऱ्याच प्रकारचे भात खातात. त्यातील एक भात म्हणजे पुलीहरा. हा चिंचेच्या पाण्यात करतात. खूपच छान लागतो. मी एकदा केला होता. माझ्या मैत्रिणीचा नवरा हा भात खूपच छान करतो. त्याला एकदा रेसीपी विचारुन तो भात मी परत एकदा घरी करुन पाहीन आणि मग सांगेन. तसेच लेमनराइस, वांगीभात, व फ्राइड राइस पण छान लागतो. खूप तिखट भाज्यांचे सांबार व टोमॅटो लोणचे तर अप्रतिम.  इंडीयन स्टोअर्स मधे दीप कंपनीचा कुलचा पराठा मिळतो तो खाल्ला आहे.

रोहिणी