एका बर्यापैकी थाटामाटाच्या हॉटेलात मी नि दोन मित्र गेलो होतो. मला नोकरी लागल्याची पहिली पार्टी. जेवून झाल्यावर (बिल मी देणार असल्याने) त्या दोघांनी कॉफी प्यायचे ठरवले. मोठ्या बसक्या कपात ती २४ रूची कॉफी आली. एकदम वाफाळती. एकाने सावकाश कप ओठांकडे नेला व घोट घ्यायचा प्रयत्न केला. थोडासा फुर्र आवाज झाला. मी आजुबाजुला जोरात पाहिले आणि म्हणालो, "नेईल तिथे लाज आणतो रे हा बाळ्या!" पण माझे वाक्य पूर्ण होईपर्यंत दुसर्या प्रिय मित्राने थोडे जोरात 'फुर्र' केले!
पुढची गोष्ट ठरलेलीच!
"बघ, माझ्या घोटात कसली जादू आहे. ती परी माझ्याकडेच बघतेय. फुर्रर्र...."
"ह्या! तुझ्यात काहीच दम नाही; ये देख.. फुर्रर्रर्रर्र.. "
हळूहळू सगळ्या पर्या, परे रागाने बघायला लागले. मी नंतर आजुबाजुला पहायचंच सोडून दिलं (नाहीतर हसू आवरणं जास्त अवघड जात होतं).