वाहन साहित्यावर मंगला ग़ोडबोल्यांचा एक विनोदी लेख प्रकाशित झाला होता. त्यातले साहित्य आठवले.. मातीने भरलेल्या ट्रकवर "माती असशी मातीस मिळशी" असे लिहिले होते. 'आई तुझा आशिर्वाद' ही असेच नेहमी आढळणारे वाक्य!
एका टॅक्सीच्या मागे " छाया, तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" असे लिहिले आहे. ही टॅक्सी बहुतेक वेळा, ऑपेरा हाऊस ते चर्चगेट मार्गावर माझ्या वाहनाच्या पुढे धावत असते. म्हणजे प्रत्यक्षात मीच त्या टॅक्सीच्या पाठीशी असते.
छाया