कवीच्या, लेखकाच्या त्रासाचे जरा जास्तच कौतुक करतो आहे स्पष्ट वक्ता. वाचकालाही वाचताना मेहनत होत नसते का? असो.
शहाण्या कवीला, लेखकाला त्याच्या शैलीवर, त्याच्या लिखाणावर असलेल्या प्रभावांची कल्पना असतेच. ते एखाद्या वाचकाला जाणवले आणि त्याने तसे नमूद केले तर त्यात काही वावगे नाही. वाचकाला केव्हा, काय वाटावे हे आम्ही सांगू शकत नाही, डिक्टेट करू शकत नाही. पण त्याला तसे का वाटावे, असा सवाल जरूर करू शकतो. हेतू जाणून घेऊ शकतो.