मिलिंदराव,
अतिशय मधुर असे हे काव्य आहे.
गुंफले तुझ्यासाठी मी शब्दांचे हार सुगंधी
माळता तयांना साऱ्या उपमांना कंठ फुटावा
लागला लळा त्यांनाही तव स्पर्शाने फुलण्याचा
कुंतलात सजता तुझिया सुमनांना कंठ फुटावा
वा!
रे मिलिंद तू रेखावी प्रतिभेची मोहक चित्रे
काव्याचे दर्शन घेता प्रतिमांना कंठ फुटावा
आपला
(माधुर्यप्रेमी) प्रवासी