'हॉर्न ओके प्लिज' आणि 'कमळ' नसलेला ट्रक तो ट्रक कसला !! पुण्यात फर्गसन रस्त्यावर या नावाचा एक पंजाबी ढाबा आहे. आणि ढाब्यामधे वाहन-पृष्ठ-साहित्याच्या अनेक पाट्या सुद्धा आहेत.
अजून एक पांचट पण लोकशिक्षणाची पाटी खरं तर लिहावी की नाही या विचारात होते..
शाळेत असताना बऱ्याच ट्रक / बस वर 'कंडोम कब कब यौन संधान जब जब' असे वाचले होते. त्यावेळी 'इतिहास' या नकोशा वाटणाऱ्या विषयाचा अभ्यास करावा लागत असल्याने 'यवनां'शी 'संधान' साधणाऱ्या फितुरांना शिरच्छेद/कडेलोट/चाबकाचे फटके यासारखी 'कंडोम' नावाची 'हिंदी' शिक्षा मिळत असावी अशी पक्की खात्री झाली होती.