वा मिलिंद! अतिशय सुंदर गझल.
भूकंपग्रस्त होण्याचा अनुभव बघीन म्हणतो
स्वप्नांचे इमले थोडे मीही रचीन म्हणतो
मतला सुंदर आहे
वाया गेल्या वर्षांच्या नोंदी मनात भरल्या

फुरसद झाली की त्यावर मी हळहळीन म्हणतो
वा! अतिशय आवडला हा शेर.
वळणावळणावर आहे येथे मिलिंद मोका
ध्येयाचे नंतर पाहू, मी भरकटीन म्हणतो
वावा! मक्ता अप्रतिम.
आपला,
(चाहता) शशांक

अल्पबुद्धीमुळे "वय मंतरलेले.." चा शेर मात्र कळला नाही.