समुद्र,
तुमचा लेख वाचून माझा ही असाच अनुभव आठवला.
अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला असताना मी सुद्धा असाच एका म्हशीला जाऊन धडकलो होतो. कॉलेजला जायला उशीर झाल्याने दुचाकीवरून मी थोडा वेगानेच जात होतो आणि अचानक काही कळायच्या आत एक म्हैस रस्त्यावर आली. आधीच कॉलेजला उशीर वर जळगावचे रणरणीत ऊन आणि सबमिशनचे टेन्शन. कर्रर्रर्रर्र...कच...कच... आवाज करीत दुचाकी म्हशीवर जाऊन धडकली. दुचाकी डाव्या बाजूला मी उजव्या बाजूला आणि म्हैस तर जणू काही झालेच नाही अशी अगदी स्थितप्रज्ञाप्रमाणे शांततेने आपले मार्गक्रमणा करीत निघून गेली. ती गेली पण दुचाकीच्या ब्रेकच्या आवाजाने बाजूचे प्रवासी आणि उन्हाचे आडोशाला बसलेले सावलीतले वयस्कर लगोलग गोळा झाले. प्रत्तेकाच्या सूचना उपसूचना अगदी हळू गाडी चालवायची पासून ते हॉर्न तरी वाजवायचा, हेडलाईट लावायचा पर्यंत. एकाने तर पी. यू. सी. काढला नसेल म्हणून ! हे सुद्धा जोडले.
अपघात छोटासा होता, गाडीचे हात वाकले, दिवा फुटला इतकेच सुदैवाने फ़्रॅक्चर झाले नाही, फक्त जखमांवर भागले.
गणेश