मला झालेला हा अपघात कामावर असताना झालेला असल्याने मला झालेला सर्व खर्च परत मिळाला, इम्प्लॉइ स्टेट इन्शुरन्स कडूनं.
पण त्यासाठी मला तिकडे जाऊन काही फॉर्म भरावे लागले. त्यावेळी त्यांनी मला काही प्रश्न विचारले ते असेः
१. अपघाताचा पंचनामा (?) झाला का?
२. तुम्ही त्या म्हशीला परत पाहिलेत तर ओळखू शकाल का?
३. तुमची त्या म्हशीच्या मालकाविरुद्ध काही तक्रार आहे का?
४. मालक माहीत नसल्यास त्या म्हशीला पकडून, तिच्या मालकाचा तुम्हाला काही शोध घ्यायचा आहे का?
असले भन्नाट बरेचसे प्रश्न विचारले, ज्याची उत्तर मलाच कळत नव्हते काय द्यावीत.
तुम्हाला माझी कथा आवडली याचा मला फार,फार आनंद होतोय. धन्यवाद.
अनिकेत