वा! आदरणीय विलासराव,

अभंग आणि त्याचे निरूपण अत्यंत वाचनीय झाले आहे. आपण नामाचा महिमा दिल्याने आपल्या 'नामी विलास' ह्या बिरूदाचे अगदी सार्थक झाले हो!

ह्यातील गद्य आपण लिहिले आहे की इतर कोणी लिहिलेले आपण उद्धृत करत आहात? आपल्या ज्ञानाबाबत शंका नाही. केवळ कुतूहल म्हणून हे विचारत आहोत.

समजणे, उमजणे आणि आकळणे ह्या ज्ञानप्राप्तीच्या ३ पायऱ्या आहेत.

ह्या तीन पायऱ्यांमधील फरक समज़ावून सांगाल काय? वरवर पाहता हे समानार्थी शब्द वाटू शकतात. त्यातील खोल अर्थ ज़ाणून घेण्याची इच्छा आहे.

आपला
(जिज्ञासू) प्रवासी