प्रवासी सान,
(मराठीतला नव्हे हो जपानी मधला सान. तुमच्या प्रतिभेपुढे आम्ही सगळे मराठीतले सान आहोत...!!!!)
ही रचना अतिशय आवडली....
एकेक शेर वाचून आनंदाची कारंजी उडतायत नुसती....
मला त्यातलं फार काही कळत नाही पण
पापण्यांनो ज़रा दूर घ्या ओढणी
होउदे ना दिठी मोकळी मोकळी
नेहमीसारखी गप्प ती राहिली
पण मला आज़ सामील झाली खळी
का विषय काढता इंद्रियांनो असे?
प्रीत माझी तिची सोवळी सोवळी
कैद करताच तू पंख फुटले मला
ही कशी कोठडी? ही कशी साखळी?
हे शेर सर्वात आवडले
सगळ्यात जास्त काय आवडले असेल तर ते म्हणजे अतिशय लहान ओळींमधून कितीतरी मोठा अर्थ व्यक्त करता तुम्ही... अल्पाक्षरी-बहुगुणी आणि अतिशय प्रसन्न अशी शैली आहे तुमची.....
काय शब्दांस या ही झळाळी नवी
सुखविते ग्रीष्मी जशी मेघछाया सावळी
मनोगतींवर तुमच्या काव्यधारा अशाच बरसत राहोत......
--अदिती