प्रत्येक शेरात सौंदर्य ठासून भरले आहे. कोणताही एखादा शेर सुंदर आहे म्हणणे म्हणजे बाकीच्या शेरांवर अन्याय होईल.

पापण्यांनो ज़रा दूर घ्या ओढणी
होउदे ना दिठी मोकळी मोकळी

आहाहा!! खास आहे!!! गुप्तहेरीसुद्धा मस्त!!

कैद करताच तू पंख फुटले मला
ही कशी कोठडी? ही कशी साखळी?

वावा!! छानच!!

शेवटून दुसऱ्या आणि तिसऱ्या शेरांची सानी मिसरा जबरदस्त! "दाटली.." मधून सगळे डोळ्यांसमोर उभे राहतेय. काय ही जादू ओळींची. "न्याय.." गंभीर आहे. मखमली वातावरणातून थोडे भानावर आणणारी. मक्त्यातील व्यथा चटका लावतेय.

मतला सुंदर असला तरी पूर्ण गझल वाचल्यानंतर बाकीच्या शेरांच्या तुलनेत तो जरा बाजूला पडल्यासारखा वाटतो (पुन्हा लक्ष वेधून घेतले नाही माझे). याला बाकीच्या शेरांचे त्यावर अधिकार गाजवणे (dominance म्हणायचे आहे खरे मला. योग्य मराठी प्रतिशब्द चटकन आठवला नाही) म्हणावे की काय? चू.भू.द्या. घ्या.

(संमोहित)चक्रपाणि

बऱ्याच काळानंतर अशी गझल वाचली की जी मला स्वतःला काही क्षणांपुरती पूर्ण भुरळ घालून एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेली. तिकडून परतणे खरे जिवावर आले होते, पण त्यावेळी शेवटच्या तीन शेरांनी आपले काम चोख बजावले असे वाटले. अर्थात, हे माझे वैयक्तिक मत आहे.