"माणसामध्ये जी जाणीव आहे ती बुद्धीहून जेंव्हा सूक्ष्म होते तेंव्हा ती कमालीची तरल होते. ती तरल जाणीव म्हणजे माणसाच्या हृदयामध्ये राहणारी जीवनज्योत होय." जीवनातील जाणिवेचे महत्त्व आणि ज्ञानदेवांनी दिलेली दोन वेगळ्या वृत्तींच्या भक्तांची उदाहरणे आवडली.
समजणे,उमजणे आणि आकळणे या तीन पायऱ्यांचा मला लागलेला साधा सरळ अर्थ सांगावासा वाटतो. समजणे ही अतिशय प्राथमिक आणि ढोबळ अवस्था आहे. सर्व मनुष्यांमध्ये ती असते. एखादी गोष्ट वरवर पाहता त्यातला जो बोध लागतो ते समजणे. जे काही समजते त्यावर थोडा खोलात विचार केल्यास जो बोध होतो ते उमजणे ( उदाः एखाद्या व्यक्ती अशी का वागली असावी ? ह्याचा विचार त्या व्यक्तिच्या भूमिकेत शिरून केल्यास जे काही कळते, ते उमजणे). या दोन पायऱ्या अवगत झाल्यानंतर समजल्या उमजल्याशिवाय सहजासहजी एखादी गोष्ट कळणे म्हणजे आकळणे असावे. अर्थात नामी_विलास यांच्यासारखा खोलात विचार करण्याची आणि मांडण्याची माझी क्षमता नाही. वरवर पाहता जे वाटले, ते असे.
चु.भु.द्या.घ्या.
श्रावणी